शेतकरी बांधवाने प्रथम आपले शेत हे एक कंपनी आहे असे ठरवून घ्या.
कंपनीला एक चांगले नाव देवून टाका
कंपनीला उद्योग म्हणून नोंद करा
कंपनीचे बँक खाते उघडा
कंपनीचा प्रकल्प अहवाल तयार करा
मग बँक लोन साठी कोणतीही बँक तयार असेल .
कंपनी कर्मचारी भरती करा आपले घरचेच कर्मचारी
चालतील किमान चार तरी असावे .

dsc_2235आपले क्षेत्र ५ एकर असेल तर फारच उत्तम पाण्यासाठी एक पाच गुंठ्याचे शेत तळे तयार करा असले तर फार उत्तम .
आता आपल्या कंपनीचा पाणी प्रश्न मिटला असेल तर लांबी रुंदी मोजून ९ गुंठे क्षेत्राचे २० प्लॉट तयार करा सर्व प्लॉट सारखे लांबी रुंदीचे व समोर १० फुट ते २० फुट कच्चा रस्ता तयार करावे .रस्ता
नंतर केला तरी चालेल जागा सोडून द्या .

आता आपले उत्पादन ठरुवून घ्या
कांदा,मिरची,टमाटे ,बटाटे,वांगे , लसुन,पालक,मेथी,
कोथांबीर,कोबी,गाजर ,वाटाणे ,बीट ,काकडी,भेंडी,गवार ,कारले,भोपळे,दोडके,वाल हे साधारण तीन ते सहा महिने घेणारे वान आपण आपल्या उत्पादनात लोंकाची गरज व आपली कमीत कमी खर्च व जास्त उत्पन मिळेल असे वान निवडून उद्योग सुरु करावा पूर्ण वेळ कंपनीला द्या .

आता आपण रस्ता सोडणार व प्लॉट पाडणार तर वेगळे वेगळे प्लॉट पाडत असताना ५ एकर जमिनीची साईज नुसार आपण ९ गुंठे चे २० प्लॉट पाडणार तर आपल्याकडे २० गुंठे रस्ता व प्लॉट लेआऊट करताना आपल्यालाला या कंपनीला जवळपास १०००० फुट लांबीचे कुंपण करावे लागणार ते कुंपण तुम्ही फळझाडे लागवड करून करावे १० फुटावर इक झाड असे १००० फळ झाडे लागवड करावे त्यात २० प्रकारचे प्रत्यकी ५० फळझाडे प्रमाणे लावावीत ती अश्या प्रकारची असावी कि त्याची फळे कुठेही सहज विकली जातात व प्रत्येक महिन्याला आपल्याला त्यातून किमान चार प्रकारची फळे बाजारात विकता आली पाहिजे.

त्याची निवड करताना नारळ,फणस,आंबा,चिकू,पेरू,संत्र,मोसंबी,लिंबू,पपई ,केळी ,बदाम,काजू,सीताफळ,रामफळ,जांभूळ,द्राक्ष,अंजीर,आवळा ,डाळिंब,अप्पेल बोर याप्रमाणे करावी.

आता आपल्याकडे २० फळझाडे व २० भाजी पाला प्रकार चे उत्पादन असेल आपले प्रतेक उत्पादन हे मर्यादित व चांगल्या प्रतीचे व सेंद्रिय खतापासून तयार झालेले असेल त्याची गरज सर्वांनाच असेल व गरज हि मागणी ची जननी आहे व सर्वच गरजेच्या वस्तू एकाच जागेवर मिळाल्या तर जास्त मागणी असेल तर चांगला ग्राहक आपल्या शोधात असेल .
तर कुठली भाजी व फळ काय दरात विकायची हे आपली कंपनी ठरवणार त्यामुळे कुणी आपल्याला दबाव अनु शकत नाही .त्यामुळे बहु उपयोगी फळ व भाजीपाला आपण उत्पादन करून शेती मध्ये खरच सोने पिकवू शकतो .
काही त्रुटी असेल तर योग्य मार्गदर्शन घ्या पण सवतः ठरवून टाका मी माल योग्य भाव मिळाला तर विकेल .

जर आपली शेती हायवे वर असेल तर फार सुंदर
नाही तर कंपनीचे एक विक्री संकुल छोठी मंडी (मौल) तयार करा .
रोज आपलाच माल आपल्याच मंडी (मौल )मधे विक्री झाला तर आपल्याला हवा तो माल आपण आपल्या कंपनीत तयार करू व आपल्याला हवा तो भाव मिळाला तर विकू हा निर्धार करवा लागेल .

यासोबत कंपनी कडे तळे असेल त्यात मासे पाळता येतील व ते उत्पादन आपल्या मंडी (मौल) मध्ये सहज विकेल .

जर आपले काही पशुधन असेल तर फार चांगले
नाही तर प्रगती नुसार पाच ते दहा देशी गाय पालन करून दुध मंडी (मौल) मध्ये आरामात विकले जाणार ते पण चांगल्या भावात वरील भाजी पाल्यात जे रिजेक्ट होईल ते गाय खातील त्यामुळे त्यांना दुसरा चारा बघण्याची आवशकता नाही .

शेणखत ,गोमुत्र कंपनीला फार मुबलक प्रमाणात मिळेल त्यातून सर्व भाजी पाला सेंद्रिय खतापासून तयार झालेला असेल आपल्याला काही सांगणे गरजेचे नाही कि रासानिक खताच्या वापरामुळे आपण दररोज थोड्या प्रमाणात जहर खात आहोत .

ज्यांना उभय आहार चालतो त्यांनी गावरान प्रजातीचे कुकुट पालन करून अंडी व चिकन आपल्या मंडी (मौल) विक्री करून हवा तो भाव मिळवता येणार .

Advertisements